Marquee

Reaccredited by NAAC with 'A' Grade with a CGPA of 3.11 * Awarded CPE status (College with Potential for Excellence) by UGC
______________________________________________________________________________________________________________

रविवार, २५ ऑगस्ट, २०१३

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र


डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र, 
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला

वार्षिक अहवाल २०१२-२०१३

श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ११ व्या योजना कळातील युगप्रवर्तक, सामाजिक विचारवंत या योजने अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र २००७-०८ या वर्षात सुरू करण्यांत आले. मा. प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. एम. आर. इंगळे, समन्वयक प्रा. डि. एन. बेसेकर सहसमन्वयक डॉ. बी. एस. झरे व व्यवस्थापक प्रा. राहुल माहुरे हे अभ्यास केंद्रा मार्फत वर्षभर अविरत विद्यार्थीभिमुख व त्यांच्या विचारक्षमतेला चालना देणारे नवनविन कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. उद्देश एकच की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संपूर्ण महापुरूषांच्या जीवनकार्याचा परिचय समाजातील सर्वच स्तरातील व्यक्तींना व्हावा. विद्यार्थ्यांमध्ये महापुरूषांची त्यांच्या कार्या विषयी आत्मीयता, जिव्हाळा, प्रेरणा निर्माण व्हावी, जेणे करून सर्वांमध्ये आधुनिक समस्यांचा सामना करण्याची सक्षमता निर्माण झाली पाहीजे. तेव्हाच समाजाचा आणि राष्ट्राचा विकास होईल.

शैक्षणिक सत्र २०१२-१३ मध्ये देखील विविध कार्यक्रम व उपक्रम आयोजित केले होते ते पूढील प्रमाणे. 

१. दि. १३ एप्रिल, २०१२ रोजी सकाळी ११.३० वा. या १८ तास अभ्यास अभियानाचे उद्घाटन सहसंचालक उच्च च्चिक्षण अमरावती विभाग, अमरावती मा. डॉ. संतोष डोंगरदिवे यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच दोन दिवसीय व्याख्यानमालेत ''महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मानवमुक्तीचा संघर्ष' या विच्चयावर प्रा. डॉ. विलास तायडे, श्री शिवाजी महाविद्यालय, अकोट यांनी प्रमुख वक्ते म्हणुन मार्गदर्षनपर भाषण केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे होते. 



२. दि. १४ एप्रिल, २०१२ रोजी सकाळी ९.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रबोधन व अभ्यास अभियानाचा समारोपीय कायर्क्रम प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाला असुन याप्रसंगी प्रमुख अतिथी व वक्ते डॉ. मोहन खडसे यांनी ''ज्ञानपिपासु डॉ. बी. आर. आंबेडकर'' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्च्चन केले. याप्रसंगी डॉ. एस. पी. देच्चमुख, उपप्राचार्य श्री च्चिवाजी महाविद्यालय अकोला यांची प्रमुख उपस्थिती होती. 

३. १८ तास अभ्यास अभियान :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे महामानव प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभ्यासरूपी विनम्र अभिवादन करण्यासाठी श्री च्चिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात दि. १३ एप्रिल, २०१२ रोजी दु. २ ते दि. १४ एप्रिल, २०१२ सकाळी ८ वाजेपर्यंत सतत १८ तास अभ्यास अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभ्यास अभियानाचे उद्घाटन मंगळवार दि. १३/०४/२०१२ रोजी सकाळी ११.०० वा. मा. डॉ. संतोष डोंगरदिवे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी भुषविले.

४. दि. २७/०५/१२ रोजी माता रमाई स्मृती दिन :- रमाई स्मृती दिनानिमित्त प्रा. संदीप भोवते यांचे विच्चेष व्याख्यान आयोजित केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. एम. आर. इंगळे होते.

५. दि. २६ जुन, २०१२ राजर्षी शाहु जयंती सामाजिक न्याय दिन :- या दिनानिमित्त ''सामाजिक समता व न्यायाचे पुरस्कर्ते राजर्षी शाहु'' या विषयावर मा. महादेवराव भुईभार, उपाध्यक्ष श्री च्चिवाजी च्चिक्षण संस्था अमरावती यांनी प्रमुख वक्ते म्हणुन विचार मांडले. तर अतिथी म्हणुन डॉ. एस. पी. देच्चमुख यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे होते.

६. दि. १८/०७/१२ रोजी अण्णाभऊ साठे स्मृती दिन :- या दिनानिमित्त  ''लोकच्चाहीर अण्णाभऊ साठे'' या विषयावर मा. प्रा. विवके हिवरे यांचे व्याख्यान आयोजित केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक प्रा.डी.एन.बेसेकर होते.

७. दि. ०१/०८/१२ रोजी अण्णाभऊ साठे जयंती. :- या दिनानिमित्त ''डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे प्रचारक लोकच्चाहीर अण्णाभऊ साठे'' या विषयावर डॉ. किरण वाघमारे अकोला यांनी प्रमुख अतिथी म्हणुन विचार मांडले. प्रमुख अतिथी म्हणुन डॉ. आर. एन. भांबुरकर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे होते.

८.  अल्प कालावधी प्रमाणपत्र अभ्यासक्रम :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीने यावर्षी सुध्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक व सामाजिक विचारांवर आधारित अल्प कालावधी प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात आला. या अभ्यासक्रमाचे उद्घाटन दि. १० ऑगष्ट, २०१२ रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. सुभाष भडांगे, प्राचार्य श्री च्चिवाजी महाविद्यालय, अकोला यांनी भुषविले.                      
 ९. दि. २४/०९/१२ रोजी पुणे करार दिन :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीने २४ सप्टेंबर हा दिवस ऐतिहासिक पुणे करार दिन म्हणुन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त ''पुणे कराराची राजकीय मीमांसा'' या विषयावर प्रा. डॉ. मोहन खडसे व प्रा. डॉ. जीवन पवार अकोला यांनी प्रमुख अतिथी म्हणुन विचार मांडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक डॉ. एम. आर. इंगळे होते.

१०. धम्मचक्र प्रवर्तन दिन :- दि. १४ आक्टोंबर, २०१२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीने सकाळी ठिक १०.०० वाजता महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांच्या उपस्थितीत व डॉ. एस. पी. देच्चमुख यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा दिवस ''धम्मचक्र प्रवर्तन दिन'' मोठा उत्साहात साजरा करण्यात आला.

११. आंतरराष्ट्रीय परिषद :- दि. २९ व ३० ऑक्टोबर, २०१२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी व पंडीत नेहरु अभ्यास केद्राच्या संयुक्त विद्यमाने ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी व पंडीत नेहरु यांच्या विचारांची सद्यस्थितीत प्रासंगिकता''  या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन पदमश्री गिरीराज किच्चोर, कानपूर यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान मा. महादेवराव भुईभार, उपाध्यक्ष श्री च्चिवाजी च्चिक्षण संस्था अमरावती यांनी भुषविले. याप्रसंगी मंचावर सन्माननीय अतिथी व बीजभाषक म्हणुन प्रा. डॉ. अन्वर सिद्दीकी, वर्धा, बाह आइद झेरेरा, इजिप्त, येरी कुकुची जापान, प्राचार्य सुभाष भडांगे, संचालक डॉ. एम. आर. इंगळे, डॉ. आर. एम. भिसे, डॉ. जीवन पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसुचालन प्रा. जया काळे यांनी तर आभारप्रदर्च्चन डॉ. एम. आर. इंगळे यांनी केले. 
समारोपीय समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष भडांगे तर प्रमुख अथिती म्हणुन डॉ. संतोष डोंगरदिवे, सहसंचालक उच्चशिक्षण अमरावती, मा. दीन दीन व्हियतनाम यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन प्रा. मोना पाटील यांनी व आभारप्रदर्शन डॉ. जीवन पवार यांनी केले.

१२. संविधान दिन :- दि. २६ नोव्हेंबर, २०१२ रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. डॉ. मोहन खडसे राज्यच्चास्त्र यांनी ''भारतीय संविधानाचे च्चिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर'' या विषयावर अभ्यासपुर्ण मार्गदर्च्चन केले.. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस.पी.देशमुख तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. एम्‌. आर. इंगळे, मंचावर उपस्थित होते. 

१३. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले स्मृतीदिन :- दि. २८ नोव्हेंबर, २०१२ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता स्त्री च्चिक्षणाचे जनक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १२२ व्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी मा. महादेवराव भुईभार, डॉ. सुभाष भडांगे व डॉ. एस.पी.देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

१४. संत गाडगे बाबा स्मृती दिन :- दि. २०/१२/१२ रोजी संत गाडगे बाबा स्मृती दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त डॉ. आर. एम. भिसे यांनी प्रमुख वक्ते म्हणुन आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. एम. आर. इंगळे होते.

१५. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन :- बुधवार दि. २४/१२/२०१२ रोजी सकाळी ११.०० वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात ''भारतीय संविधानाचे च्चिल्पकार, प्रज्ञासुर्य : डॉ. बाबासाहेब आंबेडकर'' यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते सुप्रसिाध्द साहित्यीक मा. प्रा. अच्चोक गोडघाटे, नागपूर यांनी '' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राच्च्ट्र उभारणीत योगदान''या  विषयावर चिंतनपर विचार मांडले. तर प्रमुख उपस्थिती म्हणुन डॉ. संतोष डोंगरदिवे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अरुणभाऊ शेळके, अध्यक्ष श्री च्चिवाजी च्चिक्षण संस्था, अमरावती हे होते. याप्रसंगी मा. महादेवराव भुईभार उपाध्यक्ष श्री च्चिवाजी च्चिक्षण संस्था, अमरावती व प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे मंचावर उपस्थित होते.

१६. सावित्रीबाई फुले जयंती :- दि. ०३/०१/१३ रोजी सावित्रीबाई फुले जयंती दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त ''क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले'' या विषयावर प्रा. डॉ. आर. एम. भिसे, डॉ. जीवन पवार यांनी प्रमुख अतिथी म्हणुन विचार मांडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचे संचालक  डॉ. एम. आर. इंगळे होते.

१७.  संविधान सन्मान दिन (गणराज्य दिन) :- दि. २६/०१/१३ रोजी प्रजासत्ताक दिन हा संविधान सन्मान दिन (गणराज्य दिन) म्हणुन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांच्या मार्गदर्च्चनात व उपस्थितीत शहरातुन संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. रॅलीत विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फुर्त सहभाग होता.

१८. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती :- दि. ०३/०१/२०१३ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष भडांगे यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणुन मा. महादेवराव भुईभार यांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. एस. पी. देच्चमुख, डॉ. आर. एम. भिसे, यांची उपस्थिती होती.

१९. माता रमाई जयंती :- दि. ०७/०२/१३ रोजी माता रमाई जयंती दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष भडांगे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. एस. पी. देच्चमुख, डॉ. आर. एम. भिसे, यांची उपस्थिती होती.

२०. संत गाडगे बाबा जयंती :- दि. २३/०२/१३ रोजी संत गाडगे बाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यांत आली.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. एम. आर. इंगळे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. संजय पोहरे यांनी संत गाडगे बाबा यांच्या जीवनावर विचार मांडले.

२१.  सावित्री बाई फुले स्मृती दिन :- दि. १०/०३/१३ सावित्री बाई फुले स्मृती दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या निमित्त डॉ. आर. एम. भिसे यांनी प्रमुख अथिती म्हणुन ''सावित्री बाई फुले यांचे जीवन व कार्य'' या विषयावर विचार मांडले. अध्यक्षस्थानी डॉ. एम. आर. इंगळे होते.

२२.  महाड सत्याग्रह दिन :- दि. २०/०३/१३  महाड सत्याग्रह दिन  ÷क्रांतीदिन' म्हणुन 
साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संचालक डॉ. एम.आर.इंगळे हे होते तर प्रमुख 
अतिथी म्हणुन प्रा. एस.एम. भोवते यांनी ''महाडचा ऐतिहासिक सत्याग्रह'' या विषयावर विचार 
मांडले. 

२३. ग्रामीण भागात जनजागृतीपर प्रबोधनात्मक कार्यक्रम :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीने वर्ष २०१२-१३ मध्ये फिल्ड ऍक्च्चन प्रोग्राम म्हणुन एकुण बारा गावांमध्ये जनजागृतीपर प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमा व्यतिरीक्त अभ्यास केंद्रात विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास करावा यासाठी त्यांना अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यांत आली असुन नियमितपणे दररोज विद्यार्थी अभ्यास करीत आहेत. तद्वतच प्राध्यापक, विद्यार्थी व वाचनाची आवड असणाया अभ्यासकांना केंद्राच्या ग्रंथालयातून ग्रंथ उपलब्ध करून दिल्या जातात. एकूणच अभ्यास केंद्राची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. यासाठी प्राचार्य डॉ.सुभाष भडांगे यांचे मार्गदर्शन व प्रेरणा सातत्याने मिळत असते. तर संचालक डॉ.एम.आर.इंगळे यांनी केंद्राच्या कार्याला पूर्णतः वाहून घेतले आहे. त्यांना समन्वयक प्रा. डि. एन. बेसेकर, सहसमन्वयक डॉ. बी. एस. झरे, व्यवस्थापक प्रा.राहुल माहुरे, यांचे नियमीत व उत्स्फुर्त सहकार्य आहे.
                                                
प्रा. डॉ. एम. आर. इंगळे
संचालक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केद्र,
श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा







कृतज्ञ झलक :


१९६३ साली एका छोट्याशा इमारतीत हे महाविद्यालय स्थापन झाले.तेव्हा ह्या अंकुराला दोनच पाने फुटली होती,एक कला दुसरे वाणिज्य...२०१३ मध्ये हे महाविद्यालय आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे...गेल्या पन्नास वर्षात ह्या महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत गेला. आज कला,वाणिज्य,विज्ञान,गृहविज्ञान आणि व्यवस्थापन अशा पाच शाखांनी हा ज्ञानवृक्ष चहुबाजुंनी बहरला आहे.भव्य इमारतींच्या विशाल परिसरात येथे तीस विभागात पाच हजार विद्यार्थी ज्ञानार्जन करतात.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील सर्वात मोठे महाविद्यालय अशी ह्या महाविद्यालयाची ख्याती आहे. शिक्षणासोबत वर्षभर चालणार्‍या सामाजिक,साहित्यिक,सांस्कृतिक,क्रीडा उपक्रमांनी केलेले संस्कार ही विद्यार्थांना आयुष्यभर पुरणारी शिदोरी आहे.त्याची ही एक कृतज्ञ झलक...


ब्लॉग संक्ल्पना व निर्मिती :